पवार साहेबांबद्दल केलेलं गृहमंत्र्यांचे वक्तव्य अशोभनीय
महाराष्ट्र वाहतोय शरद पवारांचे ओझे असे वक्तव्य भाजपचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या बद्दल जाहीर सभेतून केले.
महाराष्ट्र वाहतोय शरद पवारांचे ओझे असे वक्तव्य भाजपचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या बद्दल जाहीर सभेतून केले.
या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर देत अमित शाहा यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांचे वक्तव्य दुर्दैवी व त्यांच्या पदाला अशोभनीय असल्याची टीका महेश तपासे यांनी केली.
पवार साहेब हे देशातले एक मोठं नाव आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती कदाचित शहा साहेबांना त्यांच्या स्पीच रायटरने दिली नसावी म्हणून त्यांनी असं वक्तव्य केलं की काय असा टोला तपासे यांनी लगावला.
पवार साहेबांनी महाराष्ट्राचा विकास घडवलाच त्याचबरोबर देशपातळीवर कृषी क्रांती ही घडवली याचा विसर भाजपला पडला आहे. याउलट आज देश पातळीवर शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश विद्यमान मोदी सरकार बाबत आहे याची आठवण ही महेश तपासे यांनी करून दिली.
ज्या गुजरात राज्यातून देशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री येतात ते गुजरात राज्य जेव्हा भूकंपग्रस्त झालं आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक व जीवित हानी झाली त्यावेळी देश पातळीवर एकमेव नेते शरदचंद्र पवार होते ज्यांनी गुजरातच्या पुनरुभारणीचा विडा उचलण्यासाठी स्वतःहून पुढे आले आणि यशस्वीरित्या गुजरात उभ करण्याचे काम केलं.
त्या काळात गुजरात मध्ये सरकार भाजपचं, केंद्रामध्ये सरकार भाजपचं तरीदेखील एक गैर भाजपाही मराठी नेता गुजरातच्या मदतीला धावून आला ही महाराष्ट्राची संस्कृती कदाचित महाराष्ट्राच्या जावयाला माहीत नसावी.
पवार साहेबांच्या ह्या कृतीचा गौरव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला तसेच तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी जाहीर सभेतून पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे गौरव गान केले याचाही विसर कदाचित शहा साहेबांना पडला असावा.
पवार साहेबांनी महाराष्ट्रा सह देशासाठी काय केले हे सर्व जनतेला सर्वश्रुत आहे. पवार साहेबांच्या कार्याची माहिती गृहमंत्र्यांना नाही हे आश्चर्यजनक असा टोला महेश तपासे यांनी लगावला.