परदेशी टूर पॅकेज क्लब सदस्यत्वाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या २ आरोपींना अटक
फॉरेन टूर पॅकेज क्लब मेंबरशिपच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखा 3 ने अटक केली आहे.
फॉरेन टूर पॅकेज क्लब मेंबरशिपच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखा 3 ने अटक केली आहे.
यात्री क्लब ऑफ हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून परदेशी टूर पॅकेज क्लब मेंबरशिपच्या नावाखाली सर्वसामान्यांना फसवण्यासाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित करण्यात येत असल्याची तक्रार मुंबई गुन्हे शाखा 3 ला प्राप्त झाली होती.
याप्रकरणी घाटकोपर आणि साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखा 3 ने उत्तर प्रदेशातून फरार आरोपी हिमांशू तिवारी याला अटक केली आहे. याच प्रकरणात आणखी एक आरोपी नोमन कैसर यालाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासातून पोलिसांना 15-16 जणांना
फसवण्याची माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.