नागपूरच्या विद्यार्थ्यांना अनिल देशमुखांची जम्मू काश्मीरमध्ये मदत नागपूर, प्रतिनीधी
नागपूर येथील एका खाजगी कॉलेजचे 60 विद्यार्थी हे जम्मु काश्मीर येथे सहलीसाठी गेले होते.
नागपूर येथील एका खाजगी कॉलेजचे 60 विद्यार्थी हे जम्मु काश्मीर येथे सहलीसाठी गेले होते. परंतु भुस्खलन झाल्यामुळे ते अडकले असता त्या विद्यार्थ्यांनी थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत संर्पक केला. त्यांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी जम्मू काश्मीरच गुलमर्ग चे माजी आमदार यावर अहमद मीर यांना सांगुन त्या विद्यार्थ्यांना मदत मिळवुन दिली. अनिल देशमुख यांनी केलेल्या सहकार्याबदल सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.
नागपूरतील एका खाजगी कॉलेजचे 60 विद्यार्थी हे जम्मू काश्मीर येथे सहलीला गेले असता रामबाण जिल्हातील संगदलन येथे शनिवारी रात्री मोठया प्रमाणात भुस्खलन झाले. यामुळे हे 60 ही विद्यार्थी अडकुण पडले होते. यात मोठया प्रमाणात तरुणी सुध्दा होत्या. रात्रीचा अंधार, जंगल भाग आणि खाण्यापिण्याचे कोणतेही साहीत्य नसल्याने पुढे काय असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात येत होता. त्यांनी लागलीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत संर्पक करुन मदतीची विनंती केली. यानंतर अनिल देशमुख यांनी त्यांच्या जवळचे मित्र व गुलमर्ग चे माजी आमदार यावर अहमद मीर यांच्यासोबत संपर्क केला. मीर यांनी लगेच संबधीत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरवातीला सर्व 60 विद्यार्थ्यांना सुरक्षीत स्थळी हलविले. नंतर मध्यरात्री त्यांच्या जेवणाची सोय केली.
रविवारी सकाळी सर्व विद्यार्थी हे बसने पुढील प्रवासासाठी रवाना झाले. रविवारी अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातुन सर्व विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेत माजी आमदार यावर सुध्दा सहभागी झाले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी माजी आमदार यावर व विशेष करुन मदत मिळुन देण्यासाठी प्रयत्न केल्याबदल अनिल देशमुख यांचे आभार मानले.