महाराष्ट्रमुंबई

भाजयुमो, मुंबईच्या वतीने पाकिस्तान समर्थक काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांच्या विरोधात जन आक्रोश निषेध आंदोलन करण्यात आले.

पाकिस्तान समर्थक काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी दहशतवादी अजमल कसाबला केलेल्या समर्थनार्थ व देशभक्त वकील उज्ज्वल निकम यांना केलेला देशद्रोह वक्तव्याविरोधात जनता युवा मोर्चाचे मुंबई

मुंबई: पाकिस्तान समर्थक काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी दहशतवादी अजमल कसाबला केलेल्या समर्थनार्थ व देशभक्त वकील उज्ज्वल निकम यांना केलेला देशद्रोह वक्तव्याविरोधात जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने आज स्व.मीनाताई ठाकरे फुले मार्केट, कामगार मैदान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, दादर (प.) येथे काँग्रेस नेत्यांचे पाकिस्तान प्रेम आणि चुकीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे मुंबई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, नेहमीच दहशतवाद्यांच्या पाठीशी असलेली काँग्रेस आज दहशतवाद्यांना फासावर नेणारे देशभक्त उज्ज्वल निकम यांच्यावर खोटे आरोप करत आहे. देशभक्तांचा अपमान करणे आणि देशाच्या शत्रूंचा गौरव करणे हा काँग्रेस नेत्यांचा स्वभाव आहे. याआधी काँग्रेसच्या पंतप्रधानांची दहशतवादी यासिन मलिकशी मैत्री होती.

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे थोर क्रांतिकारक सावरकरजींचा अपमान करत आहेत आणि आता त्यांचा पाकिस्तान समर्थक गुंड नेता अजमल कसाबचे कौतुक करून देशभक्त वकील उज्ज्वल निकम यांना देशद्रोही म्हणत आहेत. प्रेमाची दुकाने उघडण्याचा दावा करणारे नेते एसडीपीआय सारख्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांचा वायनाडमध्ये पाठिंबा घेत आहेत.या देशात राहूनही देशाचे नसलेल्या काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांचा धिक्कार आहे. अशा काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना देशातील जनता या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवेल.

`

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button