वैयक्तिक संरक्षणासाठी मिळालेल्या शस्त्रांचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी 3 जणांना अटक
वैयक्तिक संरक्षणासाठी मिळालेल्या शस्त्रांचा बेकायदेशीरपणे वापर केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा 6 ने तीन आरोपींना अटक केली आ
वैयक्तिक संरक्षणासाठी
मिळालेल्या शस्त्रांचा बेकायदेशीरपणे वापर केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा 6 ने तीन आरोपींना अटक केली आहे.
कुर्ला पूर्व येथील काही लोक वैयक्तिक संरक्षणासाठी मिळवलेली बंदुक इतरांच्या सुरक्षेसाठी वापरत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 6 ला मिळाली होती. हे तिन्ही आरोपी कोणत्याही सुरक्षा एजन्सीत कार्यरत नसतानाही अंगरक्षक म्हणून काम करून बंदुक परवान्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करत होते. पोलिसांनी अनिल कुमार मिश्रा, राजकुमार सिंग आणि देव नारायण जैस्वाल या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखा 6 चे प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे .