Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई
बेस्टच्या मासिक पासात करण्यात आलेली दर वाढ ही अवाजवी असून तीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

याबाबत औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,
बेस्टच्या मासिक व विकली पासच्या दरात आजपासून वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईतील सामान्य माणसाची दळणवळणाची व्यवस्था ही बेस्टची बस आहे. ३५ लाख प्रवासी त्यात प्रवास करतात. गेल्या वर्षात सात ते आठ लाख प्रवासी वाढले. कामावर जाणारी माणसे, शाळकरी मुले त्यातून प्रवास करतात. त्यामुळे बेस्टच्या मासिक पासमध्ये ८७ टक्क्यांनी तर विकली पासमध्ये १७ टक्क्यांनी झालेली वाढ अन्यायकारक आहे. त्याला स्थगिती द्यावी अशी विनंती त्यांनी सभागृहात केली.