श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबई क्राइम ब्रँच 3 ने मुंबई सेंट्रल परिसरातून एका आरोपीला देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि 2 जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.
मुंबई सेंट्रल येथील नाथानी टॉवरजवळ एक व्यक्ती रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 3 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून फारुख जाफर शेख याला त्याच्या देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरसह अटक केली. फारुख विरुद्ध नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखा 3 चे प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाने वरील कारवाई केली.