क्राईम

मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकाला अटक

मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकाला अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

मुंबई गुन्हे शाखा 5 ने मुंबईतील वडाळा परिसरातून एका अफगाण नागरिकाला अटक केली आहे. हा अफगाण नागरिक गेल्या 16 वर्षांपासून मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता.
अफगाणिस्तानचा नागरिक बेकायदेशीरपणे भारतात आला असून तो मुंबईतील वडाळा परिसरात राहत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 5 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अफगाण नागरिकाला पकडले. पकडल्यावर त्याने त्याचे नाव जहीर अली खान असल्याचे सांगितले. जहीर खान ने त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्ससह पॅनकार्ड आणि आधार कार्ड बनावट बनवले होते. पोलिसांनी त्याच्याकडे थोडी कठोर चौकशी केली असता त्याने 2007 पासून हिंदुस्थानात अवैधरित्या राहत असल्याची कबुली दिली.
त्याला न्यायालयात हजर केले असता 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त(अपराध)लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 5 चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button