‘Heroes of Mumbai’ च्या माध्यमातून मुंबईच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या १७ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
'Heroes of Mumbai' च्या माध्यमातून मुंबईच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या १७ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
मुंबई –
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून २२ फेब्रुवारी २०२४ रोजी
‘Heroes of Mumbai’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, सुरक्षेसाठी सांस्कृतिक जडणघडणीसाठी ज्यांनी योगदान दिले, अशा महान विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार आहे. या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची प्रेरणा मुंबईकरांना अविरत मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात १७ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण केले जाणार आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे.
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२. स्वा. सावरकर
३. लता मंगेशकर
४. दादासाहेब फाळके
५. कुसुमाग्रज
६. होमी भाभा
७. जेआरडी टाटा
८. जगन्नाथ शंकर शेठ
९. अण्णाभाऊ साठे
१०. बाळासाहेब ठाकरे
११. धीरूभाई अंबानी
१२. रामनाथ गोयंका
१३. सेठ मोती शाह
१४. हुतात्मा बाबू गेणू
१५. अशोक कुमार जैन
१६. कोळीबांधव
१७. सचिन तेंडुलकर
सदर कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता, किलाचंद गार्डन, गिरगांव, मुंबई येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर यांच्यासहीत अन्य महापुरुषांचे वंशज देखील उपस्थित राहणार आहेत.