बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करावे – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यस्तरीय मेळाव्यात 400 संस्थाचा सहभाग

मुंबई,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी आणि नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश र्काशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता राज्यस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोमध्ये ४०० विविध औद्योगिक शासकीय व खाजगी संस्था सहभागी होणार असून हा मेळावा २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल.या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनव्हेस्टर्स व इन्क्यूबेटर्स या सर्वांना सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा पूर्व तयारीबाबत बैठक झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, ठाणेचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळसिंग राजपूत, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगूरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिंगाबर दळवी, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील,नवी मुंबईचे कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे उपआयुक्त दि.दे.पवास यासह इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, या मेळाव्यात राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यासाठी सर्व विभागांनी, स्थानिक प्रशासनाने याबाबत जनजागृती करावी. जास्तीत जास्त उद्योजक आणि विविध शासकीय आस्थापना यांनी याबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करावेत. मेळाव्यासाठी उभारण्यात येणारे स्टॉल्स आणि रोजगार नोंदणी याबाबत स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक शासकीय व खासगी संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. नमो महारोजगार मेळाव्यात जास्तीत नोकरीइच्छुक उमेदवार यांचा सहभाग वाढावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.तसेच नमो महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने उभारण्यात येणा-या सोयी सुविधांचा अशा सूचना त्यांनी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button