क्राईममहाराष्ट्रमुंबई
Trending

मुंबई क्राईम ब्रँचने चोवीस तासात केले हत्येतील आरोपींना अटक

मुंबई क्राईम ब्रँचने चोवीस तासात केले हत्येतील आरोपींना अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

खून करून मुंबईतून फरार झालेल्या हत्याऱ्याला अवघ्या २४ तासांत मुंबई गुन्हे शाखा 7 ने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

कांजूरमार्ग परिसरात एका घरात चादर गुंडाळलेला महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांच्या अनेक पथकांनी तातडीने हत्याऱ्याचा शोध सुरू केला. क्राइम ब्रँच 7 ने देखील या प्रकरणाचा तपास केला आणि प्रामुख्याने महिलेचा पती राजेश यादव याची माहिती गोळा केली आणि तो फरार असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ तंत्रज्ञानाची मदत घेत राजेश यादव हा उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 24 तासांत राजेश यादव याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त (पी-१) राज टिळक रोशन यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 7 चे प्रभारी पोलिस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने वरील कार्रवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button