अमली पदार्थांच्या व्यापारातील दोन आरोपींना ५ वर्षांची शिक्षा
श्रीश उपाध्याय
मुंबई
अंमली पदार्थांच्या व्यापाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
2018 मध्ये डोंगरी परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थ विरोधी सेलच्या आझाद मैदान युनिटने व्हिन्सेंट कोमन याला 12 ग्रॅम एमडीसह पकडले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार ने
दिलेल्या अचूक तपास अहवालाच्या आधारे , विशेष सत्र न्यायाधीश के.पी.क्षीरसागर यांनी आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण सरकारी वकील सुमेश पंजवानी आणि प्रभाकर तरंगेंनी कुशलतेने न्यायालयात मांडले.
तसेच 2020 मध्ये अमली पदार्थ विरोधी सेलच्या वरळी युनिटने साबा आबिद शेख आणि मोहम्मद आतेशाम मोहम्मद रफिक अन्सारी उर्फ विरल या दोन आरोपींना नारळ वाडी, रे रोड जवळून एकूण 129 ग्रॅम एमडीसह अटक केली होती. तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन चौहान यांनी कठोर अहवाल दिला होता. या अहवालाच्या आधारे आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे विशेष सत्र न्यायाधीश अमित व्ही खारकर यांनी आरोपी आतेशाम मोहम्मद रफिक अन्सारी याला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण सरकारी वकील वाजिद शेख आणि गीता नय्यर यांनी जोरदार पद्धतीने न्यायालयात मांडले.