बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

“लाल परी – अ रोड फेरी” फिल्मचा रशिया फिल्म फेस्टिवल मध्ये करण्यात आला समाविष्ट

आर्या न्यूज

मुंबई

“लाल परी – अ रोड फेरी” – एक चित्तवेधक डॉक्युमेंटरी चित्रपटाची, मॉस्को, रशिया येथील ट्रॅव्हल फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये समाविष्ट करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रवास ही संकल्पना घेऊन जगभरातील प्रवास ( Travel ) विषयांवरील चित्रपट या ठिकाणी निवडले जातात त्यासाठीच हा फिल्म फेस्टिव्हल जगभरात प्रसिद्ध आहे. “लाल परी – अ रोड फेयरी” या डॉक्युमेंटरी चित्रपटास या वर्षीच्या फेस्टिव्हल निवडीचा भाग होण्याचा मान मिळाला आहे. ही डॉक्युमेंटरी फिल्म आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी मॉस्को, रशिया येथील चित्रपटगृहांमध्ये दाखविली जाईल. २ मार्च व ३ मार्च २०२४ रोजी चित्रपटाचे स्क्रिनिंग व अंतिम फेरीचा समारंभ होणार आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या माजी ज्येष्ठ पत्रकार आणि डॉक्युमेंटरी चित्रपटाच्या दिग्दर्शक संतोषी गुलाबकाली मिश्रा यांनी सांगितले, “लाल परी राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था कशी चालवते हे या डॉक्युमेंटरीत दाखवण्यात आले आहे. एसटी बस ही केवळ ग्रामीण महाराष्ट्राची वाहतूक नसून त्यांची जीवनरेखा आहे. अतिशय दुर्गम डोंगराळ प्रदेश असलेले नंदुरबार आणि धुळे जिल्हे , मेळघाटाचा परिसर येथे डॉक्युमेंटरीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. कश्या अवघड परिस्थितीत एसटी आपली वाहतूक चालवते. डॉक्युमेंटरी महिला -शेतकरी, शेतकरी, व्यापारी, छोटे व्यवसायिक , सरकारी नोकर, शाळकरी मुले, विशेषतः मुली, फ्रंटलाईन वर्कर, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे जीवन एसटी बसवर किती अवलंबून आहे हे ही डॉक्युमेंटरी अधोरेखीत करते.”

ट्रॅव्हल फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील निवडीबद्दल दिग्दर्शक संतोषी म्हणाल्या, “आमच्या मेहनतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणे ही माझ्यासाठी आणि टीमसाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. इंडिपेंडंट डॉक्युमेंटरी फिल्ममेकरसाठी, फिल्म फेस्टिव्हलमधील निवड आणि त्याचे थिएटरमध्ये प्रदर्शन हे पुरस्कार मिळाल्यासारखे आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की आमच्या चित्रपटाने कल्चर सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब पटकावला आहे आणि सायप्रस (मध्य आशिया / युरोप ) येथील ट्रॅव्हल फिल्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्येही सर्वोकृष्ट पाच सिनेमात नामांकन होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीत मान्यता ही डॉक्युमेंटरी मिळवत आहे त्यावरून तुम्ही समजू शकता की इंडिपेंडंट डॉक्युमेंटरी फिल्ममेकरने किती आश्वासकरीत्या आपल्या विषयाची मांडणी केली आहे .”

चित्रपटाबद्दल – “लाल परी – एक रोड फेरी” सुमारे अर्धा तास डॉक्युमेंटरी चित्रपट प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या विस्तृत रस्त्यांच्या जाळ्यात प्रवास करवते. बस राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, इतर जिल्हा रस्ते आणि गावातील रस्ते यांना जोडते.
म्हणून, महाराष्ट्राच्या आर्थिक विकास,औद्योगिकीक आणि शेतीच्या विकासात एसटी बसचा मोलाचा वाट आहे. मुंबईची लाइफलाइन ही तिची लोकल ट्रेन आहे, तशी येथील ग्रामीण भागाची लाइफलाइन ही एसटी बस आहे.
राज्य परिवहन बस सेवा ही ग्रामीण महाराष्ट्रात कशी खोलवर रुजलेली आहे आणि 75 वर्षांपासून ती राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी बनून राहिली आहे, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
एसटी बसने समाजातील दलित आणि वंचित घटकांचे जीवन कसे बदलून टाकले हे चित्रपटात बारकाईने मांडले आहे. खर्‍या अर्थाने बस – लाल परी ही लोकांसाठी एक रोड परी आहे. ती इच्छा आकांशा पूर्ण करते आणि प्रवाशांची स्वप्ने पूर्ण करते. म्हणूनच लोकांनी तिला लाल परी असे नाव दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button