संविधानाच्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला तर निकाल आमच्याच बाजूने लागेल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे
मुंबई
दि.३० जानेवारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कुणालाही विचारला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा असल्याचं सर्वांना माहित आहे. संविधानावर आम्हाला विश्वास आहे. संविधानाच्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यास अर्थातच तो शरद पवार साहेब यांच्या बाजूने असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, कश्मीर ते कन्याकुमारी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या देशाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.शरद पवार साहेब या पक्षाचे फाउंडर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात अशी एक अदृश्य शक्ती आहे. आता ती कॉस्मिक आहे का? न्यूक्लियर हे मला माहिती नाही. अशी शक्ती कुठली आहे माहित नाही परंतु मुख्यमंत्री म्हणतात. त्या अदृश्य शक्ती प्रमाणे हे राज्य चालत आहे आमच्या माहितीप्रमाणे राज्य आणि देश संविधानाने चालला पाहिजे. आता अदृश्य शक्ती प्रमाणे चालत आहे असे मुख्यमंत्री म्हणतात. वास्तव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या युक्तीवादादरम्यान देखील सर्व बाबी आम्ही पारदर्शकपणे मांडलेला आहे संविधानावर आम्हाला विश्वास आहे संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय जर दिल्यास अर्थातच तो शरद पवार साहेब यांच्या बाजूने लागेल असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
पुढे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, छगन भुजबळ यांचा हा अपमान आहे. भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे त्यांच्या कॅबिनेटमध्ये ऐकले जात नाही, हे दुर्दैव आहे. अनेकवेळा संजय राऊत जे बोलतात ते लोकांना आवडत नाही. पण राऊत म्हणतात त्याप्रमाणे एक गँग वॉर सुरू आहे या कॅबिनेटमध्ये. कदाचित आमचे ज्येष्ठ ज्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम, आदर, विश्वास आहे. ते जवळपास माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. अशा छगन भुजबळांवर हा अन्याय होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांचे अंतर्गत काय आहे ते माहीत नाही. पण भुजबळांना सातत्याने कॅबिनेटमध्ये ज्या गोष्टी मांडता येत नाही. त्या गोष्टी त्यांना कॅमरासमोर मांडाव्या लागत आहेत. यातच या ट्रिपल इंजिन खोके सरकारचे अपयश आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हटल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आम्ही पूर्ण ताकदीने आहोत. आमचे सरकार आले तर आम्ही लगेच तो निर्णय घेऊ. आता जे केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आहे, त्या दोन्ही सरकारांनी जर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी केली तर आम्ही पूर्ण ताकदीने जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी त्याच्या बाजूने मतदान करू आणि या चारही जातींच्या आरक्षणाला पाठिंबा देऊ, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात देशात अनेक कर्तुत्वान लोक आहेत त्याच्यामुळे नेतृत्व करायला कुठेच कमतरता महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला दिसणार नाही. आज लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसत आहे. आरक्षण, महागाई, बेरोजगारी असेल अशी एवढे मोठे गंभीर प्रश्न आज राज्य आणि देशाच्या समोर आहेत. २०० आमदार आणि ३०० खासदार असूनही हे पूर्णपणे या सरकारचं अपयश आहे, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. दीदींनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या राज्यापुरता घेतला आहे. ममता दीदी इंडिया आघाडीमध्ये कायमच राहतील. नितीश कुमार यांनी जो निर्णय घेतला आहे तो वैयक्तिक निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाला आज नैतिकता राहिलेलीच नाही. सत्तेसाठी ते काहीही करतील त्यांचेच वरिष्ठ नेते अमित शहा असं म्हणले होते की, आम्ही आयुष्यात कधीही नितीश कुमारांबरोबर आघाडी करणार नाही मी म्हणलेले नाहीये सोशल मीडिया आणि चॅनलवर अमित शाहा स्टेटमेंट फिरत आहे. त्यामुळे मला असं वाटतं नैतिकता ही भारतीय जनता पक्षाकडे होती ती पूर्णपणे या नवीन भारतीय जनता पक्षाने घालवलेली आहे, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.