उत्तर भारतीय विकास मंचातर्फे उत्तर प्रदेश स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा
मुंबई
मागील वर्षांप्रमाणे या वर्षीही उत्तर प्रदेश स्थापना दिन नालासोपारा पूर्व बालाजी हॉलमध्ये उत्तर भारतीय विकास मंचच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला ज्यामध्ये उत्तर भारतीय समाजातील शेकडो लोक सहभागी झाले होते.
डॉ.ओमप्रकाश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंचाचे अध्यक्ष नागेंद्र तिवारी यांच्या कुशल समन्वयातून संपन्न झालेल्या या महोत्सवात अनेक मान्यवर उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांमध्ये राजेंद्र गावित खासदार पालघर, माजी आमदार पालघर विलास तरे, आनंद दुबे राष्ट्रीय शिवसेनेचे प्रवक्ते उद्धव गट, मंगलेश्वर त्रिपाठी (मुन्ना), वसई विरारचे माजी नगराध्यक्ष रुपेश जाधव, वैभव पाटील, भूपेंद्र पाटील, रेश्मा जाधव इ.सर्व माजी नगर सेवक आदींनी आपले विचार मांडले.
नागेंद्र तिवारी आणि उत्तर भारतीय विकास मंचाचे अधिकारी सुनील तिवारी, जय प्रकाश पांडेय, विजयभान सिंग, डॉ.दिनेश चतुर्वेदी, शिवनारायण उपाध्याय, अमित दुबे, चंद्रप्रकाश यादव, विनोद पांडेय बाबा, पंकज पांडेय, संजय गुप्ता, विनय सिंह, अखिलेश यादव, अँड. वीरेंद्र तिवारी, आनंद पांडेय, बबलू दुबे, श्रीकांत शुक्ल आदींनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
डॉ.ओमप्रकाश दुबे यांनी सर्वप्रथम नागेंद्र तिवारी यांचे वडील कै.गिरजाशंकर तिवारी यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी उपस्थितांसह दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली वाहिली आणि आपल्या भाषणात उत्तर भारतीयांचे परिश्रम आणि मुंबईच्या विकासात त्यांनी दिलेले अभूतपूर्व योगदान याकडे लक्ष वेधले. उत्तर भारतीय आणि ह्या भूमीमधील पुत्र हे एकमेकांचे मावस भाऊ आहेत असे सांगितले व अयोध्येतील श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर असे वातावरण निर्माण झाले आहे की, जसे आपण उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर उत्तर प्रदेश स्थापना दिन साजरा करत आहोत. त्याच प्रमाणे तो दिवस दूर नाही जेव्हा आपले महाराष्ट्रीय बांधव उत्तर प्रदेशात महाराष्ट्र दिन साजरा करतील.
संस्थेचे अध्यक्ष नागेंद्र तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज आम्ही उत्तर भारतीय मराठी उत्तर भारतीय झालो आहोत,कारण आमची मुले याच भूमीवर जन्माला आली आणि शिक्षण घेऊन पुढे जात आहेत, त्यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे मागणी केली की आमचे उत्तर भारतीय आणि परप्रांतीय ओ.बी.सी. आणि SCST जे उत्तर प्रदेशात आरक्षणाचा लाभ मिळवतात त्या बांधवांना महाराष्ट्रातही त्याच जातीच्या आधारावर आरक्षणाचा अधिकार मिळावा. आणि त्यानंतर यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार गावित व माजी आमदार पालघर विलास तरे यांनी दिली.
सतीश सिंह, भवन निर्माता आणि दक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश प्रजापती यांना उत्तर भारतीय विकास मंचतर्फे “उत्तर भारतीय रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर रुपेश जाधव यांना “विशेष सन्मान चिन्ह” प्रदान करण्यात आले.
व्यासपीठाचे संचालन दिनेश त्रिपाठी यांनी केले तर उपस्थित पत्रकारांचे स्वागत उत्तर भारतीय विकास मंचचे माध्यम प्रभारी शिवकुमार शुक्ला यांनी केले.