मालाड (पूर्व) मध्ये राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदीर स्वच्छ अभियान,
मुख्यमंत्र्यांनी ही घेतलेला सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर १४ ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान राज्यभर मंदीर स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात येतो आहे. मालाड (पूर्व) प्रभाग क्रमांक ४३ येथे 14 जानेवारी पासून स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली. १४ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुरार व्हिलेज येथील तपोवन मंदिरापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी तपोवन मंदिरातील मुख्य सभामंडप व परिसराची पाण्याने साफसफाई केली. तसेच अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. त्यानंतर संतोषी माता मंदिर, कोकणी माता मंदिर व विठ्ठल मंदिर, जडेश्वर महादेव मंदिर, बेल्लेश्वर महादेव मंदिर,अंबेमाता मंदिर आणि बाप्पा सीता राम मंदिर येथे मंदिर आणि मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. युवा वर्ग, महिला तसेच स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत मंदिर स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
मालाड (पूर्व) येथील मंदिर स्वच्छता अभियाना मा. नगरसेवक श्री विनोद मिश्रा स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी ही मंदिर परिसरात स्वच्छता केली. ‘’स्वच्छता हीच सेवा हा विचार मनात ठेवून आम्ही मालाडवासी हा अभियान राबवित आहोत. स्वच्छता केल्यामुळे नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता येते’’ असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.२२ जानेवारी २०२४ रोजी बालकेश्वर महादेव मंदिरात सकाळी सुंदर कांड, महाआरती तसेच प्रसाद वितरण होणार आहे आणि त्यासोबत जनसंपर्क कार्यालयात सुंदर कांड पाठ आणि प्रसाद वितरण होणार आहे. परिसरातील सर्व सोसायट्यांमध्ये दिवे लावून दिवाळी साजरी होणार आहे. २३ जानेवारी २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब उद्यान येथे गंगा आरती आणि श्रीराम आरती आणि प्रसाद वितरण तर २६ जानेवारी २०२४ रोजी कुरार रेसिडेन्सीच्या वतीने सुंदरकांड पाठ, आरती आणि प्रसाद वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यालय सचिव ब्रीज तिवारी यांनी दिली.