ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी सुरु
पक्षप्रमुख श्री. शरदचंद्रजी पवार यांच्याकडे पदाधिकाऱ्यांची मागणी
मुंबई
आगामी लोकसभा निवडणुका ध्यानात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सध्या मुंबईतील सर्व लोकसभेच्या सीट सत्ताधारी भाजप पक्षाकडे आहे, त्यापैकी ईशान्य मुंबई मतदार संघाची सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जावी यासाठी मित्रपक्षासोबत चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख श्री. शरदचंद्रजी पवार यांच्याकडे केली. शुक्रवारी सकाळी राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती येथे श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. यावेळी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष श्रीमती राखीताई जाधव, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. रवींद्र पवार साहेब, प्रवक्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड. श्री.अमोल मातेले, श्री.हरिष सनस साहेब, श्री. बबन कानावाजे,जिल्हाध्यक्ष मा.आमदार मिलिंद (अण्णा)कांबळे, श्री. अजितराव राणे श्री.आरिफ भाई सय्यद, श्री. विजूदादा शिरोडकर व श्री.रुपेश खांडगे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या राज्यात राजकीय अस्थिरता आहे. काही ‘बड्या’ नेत्यांच्या सततच्या पक्षांतरामुळे त्यांची प्रतिमा जनमाणसात मलीन झाली आहे. सत्ताधारी भाजप पक्षाने मतदानाचा गैरवापर करून मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा बळकवल्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड. श्री. अमोल मातेले यांनी केला. मुलुंड, घाटकोपर (पश्चिम), भांडुप, विक्रोळी, घाटकोपर (पूर्व)आणि मानखुर्द भागात भाजपविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पट्ट्यात खासदार मनोज कोटक यांनी जनतेसाठी गेल्या पाच वर्षांत काहीच काम केले नाही. याआधी तथाकथित किरकिऱ्या किरीट सोमय्या यांना भाजप ने खासदारकी बहाल केली. दुसऱ्या खेपेत भाजपनेच त्यांचा काटा काढला. केवळ हुकूमशाहीच्या बळावर निवडून आलेले मनोज कोटक यांना जनतेने सपशेल नाकारले. या दोन निवडणुकांअगोदर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा तिथे मोठा वर्ग आहे. तिथे मराठी, अल्पसंख्यांक आणि उत्तर भारतीय जनता राहते. त्यांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आस्था आहे. जनतेला येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचे आहे, असे एकमताने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार यांना सांगितले.
सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पक्षप्रमुख आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार यांनी सकारात्मक कथा दर्शवली, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते ऍड. श्री. अमोल मातेले यांनी दिली. येत्या २५ आणि २६ जानेवारी दरम्यान मित्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होईल, या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे आश्वासन पक्षप्रमुख आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार यांनी दिले असे ऍड. श्री. अमोल मातेले यांनी सांगितले.