मुंबई अंमली पदार्थ विरोधी सेलची (आझाद मैदान युनिट) कारवाई
३२ लाखांच्या एमडीसह दोघांना अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या आझाद मैदान युनिटने 160 ग्रॅम एमडीसह दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत 32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
एएनसी आझाद मैदान युनिटचे पोलीस अधिकारी मुलुंड परिसरात गस्त घालत होते. गस्त घालत असताना त्यांचा एक जण संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याच्याकडून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. अटक आरोपी फिरोज सय्यद याच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी नालासोपारा येथून आणखी एक नायजेरियन नागरिक जोसेफ चिकवू उर्फ जॅझ उर्फ आलेमा यालाही अंमली पदार्थांसह अटक केली. दोन्ही आरोपींकडून एकूण 160 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त, (अंमली पदार्थ विरोधी सेल, मुंबई) यांच्या सूचनेनुसार आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या पथकाने वरील कार्रवाई केली आहे.