बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या ३ आरोपींना गुन्हे शाखे 6 ने केली अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
बनावट आधारकार्ड बनवणाऱ्या तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखा 6 ने गोवंडी परिसरातून अटक केली आहे.
काही लोक पैसे घेऊन मनमानी पद्धतीने आधार कार्ड बनवत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 6 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोवंडी परिसरातील रझा एंटरप्रायझेस आणि कासमी स्कूल येथील आधार कार्ड बनवण्याच्या केंद्रावर छापा टाकला. तेथे आवश्यक कागदपत्रे न पाहता पैसे घेऊन आधारकार्ड बनवून फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी महफूज खान, रेहान खान आणि अमन पांडे या तीन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने तिन्ही आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राज टिळक रोशन यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 6 चे प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.