श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबई क्राईम ब्रँच 9 ने काही दिवसांपूर्वी अंधेरी पश्चिम येथून 1 कोटी रुपयांच्या गुटख्यासह 3 जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासानंतर आता ९ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा 9 ने काही दिवसांपूर्वी डीएन नगर पोलीस ठाणे आणि कांदिवली येथून तीन आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणाच्या तपासानंतर 11 जानेवारी रोजी पालघरच्या कासा पोलिस ठाण्यांतर्गत मुंबईच्या दिशेने येणारे चार ट्रक पकडण्यात आले असून त्यात नऊ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा ठेवण्यात आला होता. याप्रकरणी हिरालाल मंडल, नासिर मोहम्मद अली यल्गार, जमीर सय्यद आणि संजय खरात या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 10,32,62,900 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई गुन्हे शाखा 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक , पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, दीपक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वाजे, महेंद्र पाटील, पोलीस हवालदार दत्तात्रय कोळी, राहुल पवार, बाबासाहेब शेडके, पोलीस शिपाई अमोल सोनवणे, शार्दुल बनसोडे, वैभव पाटील यांनी वरील कारवाई केली.