*पंतप्रधानांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून “काळे गुलाबा” देऊन स्वागत करणार
मुंबई
मुंबईकरांना थेट रायगड जिल्ह्यात जोडणाऱ्या न्हावा-शेवा बंदराशी संलग्न मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उदघाटनाचा अखेरीस मुहूर्त ठरला आहे. ट्रान्स हार्बर लिंकच्या उदघाटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी मुंबईत येणार आहे. त्याअगोदर वसुली सरकारने जनतेचा विचार करून २५० रुपयांची टोलवसुली रद्द केल्याचे जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केली आहे. सागरी सेतूचे बांधकाम संथगतीने सुरु राहिल्याने तब्बल २ हजार १९२ कोटींचा अतिरिक्त खर्च आला आहे. या खर्चवसुलीसाठी २५० रुपयांची मनमानी टोलवसुली रद्द व्हायलाच हवी. ही मागणी त्वरित मान्य न झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबई विमानतळावर काळा गुलाब सप्रेम भेट म्हणून दिला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी दिला.
वास्तविक महाविकास आघाडीच्या काळातच या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे जवळपास ८० टक्क्याहून जास्त काम पूर्ण झाले होते. मात्र केवळ पैशांच्या मोहापायी विकले गेलेल्या चिंधीमिंद्यानी आपली बिल्डर सत्ता स्थापन करून भाजपाशी हातमिळवणी केली. हे घटनाबाह्य सरकार केवळ इथपर्यंतच थांबले नाही. तर दिल्लीकरांच्या पदरात महाविकास आघाडीचे श्रेय लाटले जावे, यासाठी उर्वरित काम जाणूनबुजून रखडवून ठेवले, असा आरोप ॲड. मातेले यांनी केला. दिरंगाईमुळे ट्रान्स हार्बरच्या बांधकाम खर्चात तब्बल २ हजार १९२ कोटींची वाढ झाल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. संपूर्ण सागरी सेतू प्रकल्प गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र जाणूनबुजून काम शंभर टक्के पूर्ण केलेले नाही, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला.
बांधकाम विनाकारण रखडवून तुम्ही सामान्य मुंबईकरांची चेष्टा केली. आता त्यात भर म्हणून २२ किलोमीटर अंतरासाठी तब्बल २५० रुपयांचा कर लादला जाणार आहे. हे सरकार केवळ सामान्यांना ओरबाडायला तयार झाल्याची टीका ॲड. मातेले यांनी केली. यायाआधीही केवळ मोदींच्या हस्ते उदघाटन व्हावे म्हणून वर्षभरापासून तयार असलेली नवी मुंबई मेट्रो रेल्वे रखडवून ठेवली. या मेट्रोच्या वर्षभरल ट्रायलरनच्या नावे फेऱ्याच सुरु राहिल्या. बोंबाबोंब झाल्यानंतर ही मेट्रो रेल्वे सुरु झाली. यानंतर अतिहट्टी त्रिकुटांनी ट्रान्स हार्बर लिंक तयार असूनही काही काम बाकी असल्याचे नाटक केले. परिणामी राज्याच्या व्यापार उद्योगावर, पर्यटनाला लेटमार्कने येणाऱ्या मोदींच्या लाल रिबीनीची झळ बसली. आम्ही टोलवसुली करू देणार नाही, उलट पंतप्रधानांना टोलवसुली मुक्त ट्रान्स हार्बर लिंक घोषित करण्यासाठी काळे गुलाब देणार, असे ॲड.मातेले यांनी सांगितले.