आमदार रोहित पवार समर्थनात केंद्र सरकार विरोधात ओबीसी सेलच्या वतीने मुक आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर
मुंबई
दि.६ जानेवारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित दादा पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुक आंदोलन करण्यात येणार होतं मात्र पोलीस प्रशासनाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यास नकार दिल्याने अखेर केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात प्रदेश कार्यालयासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून मुक आंदोलन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर ओबीसी सेलचे राज राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कंपनीवर छापे टाकल्याप्रकरणी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या तोंडाला काळ्या फिती बांधून तसेच हातात “we support Rohit Dada”,“ सत्यमेव जयते” या आशयाचे फलक घेऊन मुक आंदोलन करण्यात आले.
राज राजापूरकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने उभे राहिल्याचे त्यांना फळ मिळाले आहे. परंतु आमचे केंद्र सरकारला सांगणे आहे की, किती ही खोट्या कारवाया केल्यात तरी आम्ही कायम साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार असे राज राजापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
राज राजापुरकर म्हणाले की, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला मोठ्या प्रमाणात युवकांचा आणि लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. या युवा संघर्ष यात्रे मधून युवा नेते रोहित दादा पवार यांनी युवकांचे शैक्षणिक बेरोजगारी, शैक्षणिक आणि रोजगार यासह राज्यातील अनेक प्रश्नांसंदर्भात ही यात्रा काढण्यात आली होती या यात्रेला युवकांचा आणि लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने राजकीय सूडबुद्धीतून रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे असे राज राजापूरकर यांनी म्हटले.
राज राजापूरकर म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींविरोधात सीबीआय, आयकर विभाग आणि ईडी या तपास यंत्रणेच्या मार्फत कारवाई करत दबाव टाकण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे केंद्र सरकार विरोधात जे कोणी विरोधक बोलतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,आमदार रोहित पवार, नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील राज्य सरकार विरोधात बोलत असल्याने कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथील शिबिर संपताच रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई करण्यात आली. आम्ही न्याय व्यवस्थेला मानणारे व्यक्ती आहे. परंतु ज्या प्रकारे केंद्र सरकार आणि राज्यातील राज्य सरकार राजकीय सडबुद्धीने कारवाई करत आहे त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आवाज उचलेल असे राज राजापूरकर म्हणाले.
ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांच्या नेतृत्वात मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी सलिम बेग राज्य विस्तारक, असिफ खलिफे राज्य समन्वयक, अकबर चौगुले कार्याध्यक्ष मुंबई प्रदेश, मुकेश पाटील ठाणे ग्रामीण अध्यक्ष, अमित भोईर नवी मुंबई अध्यक्ष, शुभम राठोड कल्याण अध्यक्ष, विनोद शेलार अंबरनाथ अध्यक्ष, गुरुनाथ निमसे मुरबाड अध्यक्ष, ईशान शेख संघटक सचिव मुंबई प्रदेश, सिमाचल नायक ऐरोली विधानसभा अध्यक्ष, कैलाश शेंद्रे अंबरनाथ ग्रामीण अध्यक्ष, प्रल्हाद बोंडे प्रदेश सरचिटणीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.