आवेष्टित वस्तूंवर युनिट प्राईझ आवश्यक
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती ग्राहकांना कळणार किंमत
मुंबई :
अनेक ग्राहकोपयोगी पदार्थ, वस्तू यांची विक्री आवेष्टित स्वरूपात म्हणजे पॅकेज्ड गुड्स म्हणून केली जाते. ग्राहकांच्या माहिती व हितासाठी अशा वस्तूंच्या लेबलवर त्या वस्तू संदर्भातील संपूर्ण माहिती छापावी लागते. जसे कि, वस्तूचे नाव, उत्पादकाचे नाव, निर्मिती किंवा पॅकेजिंग महिना, साल, वस्तूची कमाल विक्री किंमत वगैरे. आता दि. १ जानेवारी २०२४ पासून अशा वस्तूंवर युनिट सेल प्राईझ देखील छापणे बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. त्यानुसार सर्व संबंधित वस्तूंचे उत्पादक, निर्माते, वितरक आदी सर्वांनी याची तातडीने दखल घ्यावी व त्यानुसार नियमाचे योग्य असे पालन करावे असेही त्यांनी आवाहन केले.
राज्याची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री अँन्ड अँग्रिकल्चर या संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले कि, मुळात या स्वरूपाचा बदल सन २०२२ मध्ये करण्यात आला होता. त्यावर संबंधित उद्योजक, व्यापाऱ्यांकडून ज्या काही सूचना आल्या त्याचा अभ्यास करून योग्य असे प्रतिनिधित्व शासनाकडे करण्यात आले होते. सर्व संबंधितांना नवीन बदल अंमलबजवानीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्याची अंमलबजावणी १ वर्ष पुढे ढकलण्यात आली होते. त्यानंतरही पुन्हा पुढे ढकलण्यात येऊन १ जानेवारी २०२४ करण्यात आली. या मधल्या दिड दोन वर्षाच्या काळात संबंधितांनी वस्तूवर युनिट सेल प्राईझ छापण्याच्या दृष्टीने तयारी केली असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याबाबत सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले. सदरहू पॅकेज्ड कमोडिटी नियमां संदर्भात काही सूचना असल्यास त्या महाराष्ट्र चेंबरला कळवाव्यात, असेही महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सुचविले.
०००
चौकट : नेमका बदल
नियम १ जानेवारी २०२४ पासून लागू झाले आहेत. युनिट सेल प्राईझ कशी छापावी, हे देखील देण्यात आले आहे. त्यानुसार १ किलो पेक्षा कमी किंवा १ किलो पर्यंत क्वान्टेटी त्यापेक्षा जास्त क्वान्टेटी असल्यास पर किलोग्रॅम द्यावी लागेल. जर लांबी १ मीटर पेक्षा कमी / १ मीटर असेल तर पर सेंटिमीटर अशी युनिट सेल प्राईझ छापावी लागेल आणि १ मीटर पेक्षा जास्त असल्यास पर मीटर छापावी लागेल. वजन १ लिटर असले तर पर मिलिलिटर आणि त्यापेक्षा जास्त असेल तर पर लिटर छापावी लागेल. नगाप्रमाणे वस्तू विकली जात असेल तर प्रत्येक नगाप्रमाणे छापावी लागेल. जर किरकोळ विक्रीची किंमत हि युनिट सेल प्राईझ एवढीच असेल तर युनिट सेल प्राईझ छापण्याची आवश्यकता नसेल.