बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

निवडणूक आयोगाच्या निकालापूर्वी भाष्य करणे म्हणजे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासारखे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई दि.२६ डिसेंबर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद पूर्ण झाला आहे आयोगाने निकाल राखीव ठेवला असून केव्हाही निर्णय येणे अपेक्षित आहे अशा परिस्थितीत सुनील तटकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल असे वक्तव्य करणे म्हणजे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासारखे आहे असे प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा अजित दादा यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींकडून करण्यात येत होता. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला लेखी पत्राद्वारे तक्रार केली होती. आम्ही केव्हाही अशा प्रकारे दावा केला नाही. निवडणूक आयोग एक स्वातंत्र विभाग आहे. त्यावेळी निवडणूक आयोगाने युक्तिवाद सुरू असताना दोन्हीही पक्षांना निवडणूक आयोगास संदर्भात असे भाष्य करू नये असे स्पष्ट सांगितले होते. याचिकेवर या संदर्भात लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. तरी देखील अजित दादा यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींकडून पक्ष आणि चिन्हाबाबत वक्तव्य करण्यात येत आहे याचा अर्थ निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का असं देखील यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक अजित दादा समर्थक आमदार आणि शिवसेना शिंदे गटाला भाजप च्या तिकिटावरच लढवावे लागतील या दोन्हीही पक्षातील आमदार आणि खासदार स्वतःहून भाजपच्या तिकिटावर लढण्यास तयार होतील अशी परिस्थिती सध्या या तिन्ही पक्षांमध्ये सुरू आहे.

अजित पवार यांचा हाच स्वभाव आवडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या राजीनाम्या वेळी देखील अजितदादा यांची भाषा कसे बोलत होते. ते लोकांवर कसा दबाव टाकतात होते हे सर्व जनतेने चॅनलवर बघितलेलं आहे. शेवटी मोठी माणसं आहेत ते काहीही करू शकतात असा टोला देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. अजित दादा यांना काय खुपते हे मला माहीत नाही त्यांना काय खूपल की त्यामुळे ते बीजेपी सोबत गेले हे त्यांनाच माहीत. दुसऱ्याचे मन मला ओळखता येत नाही मी काही भविष्य कार नाही आहे असेही यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले

 

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करण्यासाठी वरच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत बोलण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button