अंधेरी येथील गुरुद्वारा श्री नानक नगर येथे वीर बालदिन साजरा करण्यात आला
अंधेरी येथील गुरुद्वारा श्री नानक नगर येथे वीर बालदिन साजरा करण्यात आला
श्रीश उपाध्याय/मुंबई
अंधेरी येथील जेबी नगर येथील गुरुद्वारा श्री नानक नगर येथे आज बालदिन साजरा करण्यात आला.
9 जानेवारी 2022 रोजी देशात श्री गुरु गोविंद सिंग यांचा प्रकाश पर्व साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जीनी अशी घोषणा केली होती कि श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे धाकटे पुत्र बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी
यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून दरवर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’आयोजित करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जीची घोषणेनुसार श्री गुरु गोविंद सिंग यांच्या साहबजादाच्या अतुलनीय हौतात्म्याला भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली. त्यानुसार आता दरवर्षी २६ डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
वीर बालदिनानिमित्त मंगळवारी गुरुद्वारा श्री नानक नगर, अंधेरी जेबी नगर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टी मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय,भाजपा महाराष्ट्र प्रदेश निधि प्रमुख संतोष केलकर, करनदीप सिंह लुगानी
उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष (युवा मोर्चा),स्नेहा वेमुलकर,गुरुद्वारा कमिटी के सलाहकार गुरविंदर सिंह कोहली, अध्यक्ष अमरजीत सिंह चढा,सचिव रंजीत सिंह सैनी, खजांची तेजिंदर सिंह सेठी,ज्ञानी विनोद सिंह ,सुन्नी साहनी,बब्बल दादिच यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर नागरिकांनी लंगरातही सहभाग घेतला.
श्री गुरु गोविंद सिंग
जी यांचे धाकटे पुत्र बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांची तपशीलवार माहिती बातमीसोबत दिली आहे.
सर्व देशवासियांनी आपल्या देशाच्या बालवीरांच्या हौतात्म्याची कहाणी आपल्या मुलांना सांगायलाच हवी.