बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घ्यायचो

मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी नेहमी घेतली

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब

पुणे दि.२५ डिसेंबर

 

मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची. आमच्या काळात बंड नव्हत आम्ही बसून निर्णय घ्यायचो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे. पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार साहेब म्हणाले की, आमचं बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. सर्वांनी बसून निर्णय घतेला होता. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, असे शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार साहेब म्हणाले की, गेली १० ते १५ वर्ष बारामती आणि त्या भागात माझं लक्ष असत नाही. साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावं आणि कुणी जबाबदारी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही. गेल्या दहा वर्षात एकाही गोष्टीत मी लक्ष दिलं नाही. त्यामुळे कुणालाही काम करण्यात अडचण आणण्याची भूमिका घेतली नाही. परिसराचा नाव लौकिक वाढेल याची काळजी घ्यावी, असं शरद पवार साहेब म्हणाले. कुणी कुणाचं ऐकावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली. यात मला आनंद आहे, असेही पवार साहेब म्हणाले.

शरद पवार साहेब म्हणाले की, इथेनॉलचं उत्पादन वाढवावं अशी मागणी सर्वांची आहे. देशात वाहने वाढत आहेत. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवणं गरजेचे आहे. इथेनॉलला आम्हीदेखील प्रोत्साहन दिलं. पण आत्ताच्या केंद्र सरकारच्या नितीमध्ये कमतरता असल्याचे शरद पवार साहेब म्हणाले. याबाबात काही गोष्टी शिल्लक असून, आपण स्वतः मोदी आणि शहा यांना लोकांचं म्हणणं पाठवलं असल्याचे शरद पवार साहेबांनी यावेळी सांगितले.

शरद पवार साहेब म्हणाले की, सर्व्हे नेहमी येत असतात. त्यात ते अनेकवेळा खरे खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते. पण प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला. त्यामुळे सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये असेही शरद पवार साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. इंडियाच्या बैठकीत मी स्वतः खर्गे यांना प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे असे सांगितल्याचेही शरद पवार साहेब म्हणाले.

पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, क्रीडा मंत्रालायने भारतीय कुस्ती परिषदेची नवी बॉडी निलंबित करण्यास उशीर केला. त्यांनी यापूर्वीच हे करायला हवे होते. ज्या महिला खेळाडूंनी भारताचा सन्मान वाढवला. त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. देशाकडून खेळताना कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला खेळाडूंसोबतची वागणूक योग्य नव्हती. यापूर्वीच भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. असेही शरद पवार साहेब यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button