संसदेतील खासदारांच्या निलंबना विरोधात मोदी सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने आंदोलन
लोकशाही वाचवण्याकरिता संविधानाची प्रतिकृती हातात घेऊन केंद्र सरकारच्या हिटलरशाही विरोधात आंदोलन
खासदारांचे निलंबन हे इतिहासातील काळा दिवस महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे
मुंबई- दि २३ डिसेंबर
१३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करण्याची मागणी लावून धरली. सरकारला प्रश्न विचारत असल्याने विरोधी पक्षातील दोन्ही सभागृहामधील अनेक खासदारांना निलंबन करण्यात आले होते. या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयाबाहेर सरकार विरोधात संविधानाची प्रतिकृती हातात घेऊन केंद्र सरकारच्या हिटलरशाही विरोधात आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वामध्ये मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, महिला प्रदेश चिटणीस हेमाताई पिंपळे, पनवेल महिला निरीक्षक भावनाताई घाणेकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, अल्पसंख्यांक विभागाचे मुंबई विभागीय अध्यक्ष सुहेल सुभेदार, प्रवक्ते अमोल मातेले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सचिन नारकर व महिला कार्यालयीन सचिव स्वातीताई माने यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे म्हणाल्या की, संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याकरिता खासदारांचे निलंबन केंद्र सरकारने घाबरून केले आहे. हे इतिहासातील काळा दिवस आहे. केंद्र सरकारने लोकशाहीच्या पवित्र मंदिरात लोकशाहीची हत्या केली आहे. विरोधी पक्षामुळे लोकशाही टिकून आहे. सरकारच्या तानाशी विरोधात आणि ज्याप्रमाणे विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यात येत आहे या विरोधात राज्यव्यापी दौरा करणार आहे. आज महागाई वाढली आहे. त्याच बरोबर महिला सुरक्षित नाही या सर्व प्रश्नावर चर्चा करावी ही मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांची होती. या वर चर्चा नकरता सरकारने त्यांना निलंबन केले आहे. असेही रोहिणी ताई खडसे यांनी म्हटले आहे.