Uncategorizedबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

ओबीसी विद्यार्थींच्या वसतिगृहासाठी

भाडे तत्त्वावर इमारतीसाठी इमारत मालकांकडून अर्ज आमंत्रित

मुंबई,

इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलांचे एक व मुलींचे एक शासकीय वसतिगृह सुरु करावयाचे आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या 30 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. या परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, सिडको तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांचेकडून इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इतर मागास प्रवर्गातील मुलांकरिता १०० मुलांच्या क्षमतेचे एक शासकीय वसतिगृह आणि इतर मागास प्रवर्गातील मुलींकरिता १०० मुलींची क्षमता असलेले एक शासकीय वसतिगृह अशा दोन वसतिगृहाकरीता इमारत तपशिल असा आहे. इमारत मुंबई उपनगर परिसरात असणे आवश्यक आहे. किमान क्षेत्रफळ दहा हजार चौ. फुट असावे. या इमारतीमध्ये १० स्वच्छतागृह व १० स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी व पूर्णत्वाचा दाखला असावा. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार इमारत मालक देण्यास तयार असलेबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील. प्रत्येक वसतिगृहाकरिता स्वतंत्र दोन इमारती आवश्यक आहेत.

इच्छूक म्हाडा, सिडको, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांनी नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, आर सी चेंबुरकर मार्ग, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, चेंबुर (पूर्व), मुंबई ७१, (दूरध्वनी क्रमांक ०२२ २५२२२०२३) या कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button