Uncategorizedबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित

पुढील अधिवेशन २६ फेब्रुवारी रोजी मुंबईत

नागपूर,

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत, तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, या अधिवेशनात विधानसभेत प्रत्यक्षात १०१ तास १० मिनिटे कामकाज झाले. यामध्ये रोजचे सरासरी कामकाज १० तास ५ मिनिटे इतके झाले. या अधिवेशनात सदस्यांची सरासरी उपस्थिती ही ९३.३३ टक्के इतकी होती, तर कमीत कमी उपस्थिती ६४.७१ टक्के इतकी होती. एकूण सरासरी उपस्थिती ही ८१. ६९ टक्के इतकी होती.

अधिवेशनात एकूण ७५८१ तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यातील २४७ स्वीकृत झाले, तर ३४ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. अधिवेशनात दोन विषयांवर अल्पकालीन चर्चा झाली. अधिवेशनात एकूण २४१४ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ३३७ स्वीकृत, तर ७० लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली.

या अधिवेशनात विधानसभेत १७ शासकीय विधेयके पूर:स्थापित तर १७ संमत झाले. मागील अधिवेशन सत्रातील एक विधेयकही संमत झाले. नियम २९३ अन्वये ३ सूचनांवर चर्चा झाली. अशासकीय ठरावाच्या एकूण २६३ सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी १८७ सूचना मान्य करण्यात आल्या.

या अधिवेशनात विधानपरिषदेत सभागृहाच्या एकूण बैठकींची संख्या 10, प्रत्यक्षात झालेले कामकाज 71 तास 09 मिनिटे, रोजचे सरासरी कामकाज 7 तास 06 मिनिटे तसेच संपूर्ण अधिवेशनासाठी सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 95.55 टक्के, कमीत कमी उपस्थिती 60 टक्के तर एकूण सरासरी उपस्थिती 82.36 टक्के होती.

तारांकित प्रश्न त्यापैकी प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या १८१९ आणि स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या 452, उत्तरीत झालेल्या प्रश्नांची संख्या 47 इतकी आहे.

नियम 289 अन्वये प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या 42 आहे. लक्षवेधी सूचना प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या 623, मान्य झालेल्या सूचनांची संख्या 142 तर चर्चा झालेल्या सूचनांची संख्या 30 अशी आहे. विशेष उल्लेखांच्या सूचना पैकी प्राप्त सूचनांची संख्या 119 व मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनाची संख्या 133 आहे. एकूण प्राप्त औचित्य मुद्दे 115, नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा: प्राप्त सूचनाची संख्या 26 ,मान्य झालेल्या सूचनांची संख्या 25 ,चर्चा झालेल्या सूचना पाचहून अधिक आहेत.

शासकीय विधेयके : विधानसभा विधेयके पारित करण्यात आलेली संख्या 14, संयुक्त समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संमत करण्यात आलेले विधानसभा विधेयक 1, विधानसभेकडे शिफारशी शिवाय परत पाठवण्यात आलेली विधेयके(धन विधेयके) तीन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button