क्राईममुंबई

गुन्हे शाखे 4ची कार्रवाई

बनावट कागदपत्रे बनवून डंपर विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

श्रीश उपाध्याय/मुंबई

मुंबई गुन्हे शाखा 4 ने बनावट कागदपत्रांच्या आधारे डंपर विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून 3 आरोपींना अटक केली आहे.

जोगेश्वरी येथील काही लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे डंपरची खरेदी-विक्री करून राज्य सरकारचे लाखोंचे नुकसान करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 4 ला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी जोगेश्वरी पश्चिम येथे छापा टाकला. छाप्यादरम्यान एक आरोपी आणि तीन डंपर पोलिसांनी पकडले. या आरोपीकडे चौकशी केली असता डंपरची कागदपत्रे कालबाह्य झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपी ते डंपर खरेदी करायचे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने तो त्या डंपरचा चेसीस क्रमांक आणि इंजिन क्रमांक बदलायचा. याशिवाय अरुणाचल प्रदेशला आरटीओकडून चुकीच्या पद्धतीने एनओसी मिळवायचा. या एनओसीच्या आधारे तो वसई-विरार आरटीओमध्ये डंपरचा नवीन नोंदणी करून 12 ते 15 लाख रुपयांना लोकांना विकायचा. या आरोपीच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी अन्य दोन आरोपींनाही अटक केली आहे.
सिकंदर शाह, रमजान शेख आणि अंग्यू रेड्डी या तीन आरोपींना 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई गुन्हे शाखा 4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे , नितीन पाटील आणि टीम यांनी केली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button