बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रह तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर,

राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुयोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. या दृष्टीने उपग्रह तंत्रज्ञानाची मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारशी समन्वय साधण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत विविध प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितिन करीर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपत्तीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असून त्यादृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव सादर केले जावेत असे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मदतकार्यात वापरण्यात येणारी यंत्रसामग्री सुस्थितीत राहण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. यासह ही यंत्रणा राज्यातील आपत्तीग्रस्त भागात वेळेत पोहोचण्यासाठी नियोजन असावे.

या बैठकीत आपत्ती व्यवस्थानाशी संबंधित विविध यंत्रणा व विभागांद्वारे सादर केलेल्या नियोजन व खर्चांच्या मागण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये आपत्ती प्रसंगी मदतकार्यामध्ये सहभागी होणाऱ्या सैन्यदल तसेच केंद्र शासनाच्या एनडीआरएफसह राज्य शासनाच्या एसडीआरएफ, नगरविकास, सार्वजनिक आरोग्य विभाग यासह अग्नीशमन यंत्रणाद्वारे मागणी केलेल्या विविध बाबींवर चर्चा झाली. याप्रसंगी मदतकार्य व आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य शासन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असून त्या दृष्टीने विविध यंत्रसामग्री व प्रणालींची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

आपत्तीमुळे ढासळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या व्यक्तींचे अचूक स्थान सांगणारे रेस्क्यूसेल व्हेइकल, सॅटेलाईटबेस कम्युनिकेशन सिस्टिम यासह अनेक महत्वपूर्ण प्रणालींची माहिती यावेळी सादर करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button