करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

वांद्रे पश्चिमचा समुद्र किनारा नववर्ष स्वागताला सजला

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची संकल्पना

21 डिसेंबर पासून पर्यटकांना खुला होणार

मुंबई, दि. 20

वांद्रे पश्चिम येथील समुद्र किनारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रंगीबेरंगी आकर्षक दिव्याची रोषणाई करण्यात आली असून ही रोषणाई 21 डिसेंबर पासून पर्यटकांसाठी खुली केली जाणार आहे

गेती आठ वर्षे आमदार अँड आशिष शेलार यांच्या संकल्पेतून
नववर्ष स्वागताला वांद्रे पश्चिम येथील सागरी सेतू जवळील योगा गार्डन परिसरात प्रोमोनाडवर रंगीबेरंगी दिव्याची रोषणाई करण्यात येते. मुंबईकरांचे आकर्षक ठरणारी रोषणाई यावर्षी 21 डिसेंबर पासून पर्यटकांना खुली करण्यात येणार असून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत 21 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता औपचारिक उद्घघाटन करण्यात येणार आहे. दररोज या परिसरात नवोदित तरुण कलावंतांची गाणी, बँन्ड आणि संगीताचे कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button