“ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्यास मोकळे
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची उबाठावर टीका
मुंबई, दि. 16
एकदा “ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्याचा मार्ग मोकळा, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उबाठाच्या मोर्चावर टीका केली आहे.
मोर्चा काढून धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली असून उबाठा नेहमीच विकासाच्या विरोधात काम करते. प्रकल्प अडवून कटकमिशन वसूली करणारे मुंबईकरांसाठी नाही तर कटकमिशन साठी संघर्ष करीत आहेत. यांच्या सरकारच्या काळातच धारावीच्या पुनर्विकासाचा टेंडर निघाले.
उध्दव ठाकरे (UT) म्हणजे यु टर्न… आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यातून प्रत्येक वेळी यु टर्न घेतले आहेत. आता त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करणारी भूमिका घेतली आहे. “यु टर्न फेम” श्रीमान उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तोही “टि जंक्शन” वरूनच.
म्हणजे कुठल्याही बाजूला वळायची सोय आहेच.
एकदा “ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्याचा मार्ग मोकळा. आज म्हणाले त्यांनी घेतलेला बिल्डर धार्जिणा एक निर्णय दाखवा. बघा घेतला का यु टर्न?
कोविड मध्ये बिल्डरांना 12 हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला? असा सवाल करीत आमदार आशिष शेलार यांनी मुंबईकरांना उद्देशून म्हटले आहे की, धारावीकरांचा यांना पुळका जोरात, खोके घेऊन अदानी कधी जाणार आता मातोश्रीच्या दारात? असा थेट सवाल त्यांनी करीत जोरदार हल्लाबोल केला आहे.