भारतीय जनतेला हवे आहे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व – भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी
भाजपाचे विकासाचे समाजकारण जनतेला आवडू लागले
भाजपाचे विकासाचे समाजकारण जनतेला आवडू लागले आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मागच्या नऊ वर्षांपासून देशाचा कारभार करताना आमच्या विकासाचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी, कष्टकरी महिला, श्रमिक यांच्या कल्याणकारी योजना लोकांच्या मध्ये मोदी नेतृत्वाबाबत प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. हे काल ही दिसून आले असून त्याचाच परिपाक म्हणून तीन राज्यात भाजपाला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिली.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे. की, पाच राज्याचा निवडणूक निकाल नुकताच जाहीर झाला वास्तविक पाहता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्व ठिकाणी भाजपला यश मिळणार नाही अशा प्रकारच्या भविष्यवाणी आमच्या विरोधकांनी केली होती. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत अनेकांनी तर भाजप संपल्याची भाषा करताना लोकशाही लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल आहे आणि देशातून आता भाजपाचे उच्चाटन होईल या अविर्भावात भूमिका मांडली होती. माध्यमांनी देखील चुकीचे अंदाज ठरवले होते. मात्र एखाद्या देशात प्रजा जेव्हा सुखी समाधानी नांदते. तेव्हा त्या देशातील सामान्य माणसाचा विश्वास देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यवस्थेवर असतो तसंच काही म्हणावा लागेल मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यासह तेलंगणामध्ये देखील मतांची टक्केवारी वाढली आहे. याचे मूळ कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी “सबका साथ सबका विकास” यातून काम करताना केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत कधीच पोहोचल्या नाहीत. अवघ्या नऊ वर्षांत देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम मोदीजींनी केलं एक विश्वास सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आणि म्हणून हेच नेतृत्व आपलं भलं करू शकतो याचा सार्थ दाखवणारा म्हणजे विधानसभेचा निकाल होय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी काँग्रेस देशभक्त करू हा नारा दिला होता तो 100 टक्के खरा होत असताना भविष्यात देशातून काँग्रेस पक्षाचे उच्चाटन झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास देखील प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी बोलून दाखवला राजकारण हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करता कामा नये केंद्र सरकारच्या विविध योजना आणि महिलांच्यासाठी घेतलेले निर्णय याचाच परिपाक म्हणून सत्याचा विजय झाला असे म्हणता येईल भविष्यात महाराष्ट्रात देखील पुन्हा कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
बातमीतील चौकट
तर मोठे पवार म्हणतील अजित तू आहेस तिथेच थांब..!
विधानसभा निवडणुकीचे निकाल ऐकल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार निश्चित म्हणत असतील की, अजित तू तिथेच थांब. इकडे येऊ नकोस, तर मीच तुझ्याकडे येतो. कदाचित भविष्यात दिसून येईल. दुसरा असा आहे की, खासदार सुप्रियाताईंना देशांमध्ये अस्थिरता दिसते पण, निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर त्यांच्या मनात आता स्थिरता आहे. का..? नाही हे त्यांनी सांगावं असे कुलकर्णी यांनी केला.
=======================