श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबईतील पवई पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अपहरण आणि दरोड्यातील दोन आरोपींना अटक करून तत्परतेचे उदाहरण ठेवले आहे.
गेल्या रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मोहम्मद जीशान अब्दुल खालिक हे काम आटोपून घराकडे निघाले. चांदिवली जंक्शनजवळील पेट्रोल पंपाशेजारी बस स्टॉपवर जीशान उभा होता. त्याचवेळी दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी चाकूच्या धाकावर झीशानचे अपहरण केले. दोन्ही चोरट्यांनी झीशानला सहार विमानतळाच्या पार्किंगमध्ये नेले आणि त्याच्याकडील मोबाइल आणि नेट ट्रान्सफरमधून 2050 रुपये लुटले.
याप्रकरणी जीशानने पवई पोलिसांकडे तक्रार केली.
पवई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि 24 तासांच्या आत मोहम्मद शकील उर्फ अड्डू
जमील चौधरी आणि आमिर जावेद शेख या दोन आरोपींना अटक केली.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस उपायुक्त (झोन 10) दत्ता नलावडे, सहायक पोलिस आयुक्त भरतकुमार सूर्यवंशी, प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुप्रिया पाटील, पोलिस निरीक्षक गणेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पारटकर, पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील, अनिल कांबळे, पोलिस हवालदार तानाजी पाटील, पोलिस हवलदार तानाजी ताडेकर, बाबू येडगे, सिपाही सूर्यकांत शेट्टी व पथकाने वरील कारवाई केली आहे.