MHB पोलिसांची कारवाई
सुमारे चार लाख रुपयांच्या गुटख्यासह दोघांना अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
बोरिवलीच्या MHB पोलिसांनी गोराई परिसरातून सुमारे चार लाख रुपये किमतीचा गुटखा विक्रीसाठी आणलेला एक टेम्पो जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
एमएचबी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले कि, पोलिस अधिकारी सूर्यकांत पवार हे त्यांच्या पथकासह गोराई परिसरात गस्त घालत होते. तेव्हा गोराई डम्पिंगजवळ गुटख्याने भरलेला ट्रक गुटखा वाटण्यासाठी आल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली असता त्यात 8 गोणी विमल पान मसाला व 2 गोणी तंबाखू आढळून आली. जप्त केलेल्या मालाची किंमत 3,74,000 रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी राघवेंद्र आणि सौरभ गुप्ता यांना अटक केली आहे. पोलीस दुसऱ्या आरोपी झा-भंगारवालाचा शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.