महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद
यांच्या १४१ व्या जयंती निमित्त अभिवादन
श्रीश उपाध्याय
कोल्हापूर :
भारतीय औद्योगिकरणाचे शिल्पकार,‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या 141 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, वालचंद हिराचंद हे भारताच्या व महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचे प्रमुख प्रणेते व आधारस्तंभ, प्रखर देशभक्त व स्वदेशी उद्योगांना चालना देणारे होते. त्यांनी पहिली भारतीय कार `प्रिमिअर पद्मीनी` ची निर्मिती केली. विमान निर्मितीच्या पहिल्या भारतीय कारखान्याचे संस्थापक, हिंदुस्थान एअरक्राफ्ट लि. , हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लि., जहाज निर्मितीचा पहिल्या भारतीय कारखान्याचे संस्थापक, हिंदुस्थान शिपयार्ड लि., विशाखापट्टनम् आणि पहिल्या भारतीय प्रवासी जलवाहतुक कंपनी `सिंधीया स्टीम नेव्हीगेशन`ची स्थापना केली. संरक्षण विभाग, अंतरीक्ष मोहीम, मिसाईलसाठी लागणारी उत्पादने निर्मिती करणार्या कारखान्याचे ते संस्थापक होते. त्यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. उभी केली.
फोटो ओळी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या 141 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.