काळा चौकीच्या जिजामाता नगरमधील उपोषणकर्त्यांना आमदार अँड आशिष शेलार याची भेट
मुंबई, दि. 20
आपल्या हक्काच्या घरांसाठी आमरण उपोषण करणाऱ्या काळा चौकीच्या जिजामाता नगर उपोषणकर्त्यांना नागरिकांना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार याची आज भेट घेतली.
उपोषणकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला तसेच एसआरएच्या सीईओंशी संपर्क करुन उद्या याबाबत तातडीने संयुक्त बैठक लावण्याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, जिजामाता नगरमधील 3 हजार मराठी कुटूंबांचे झोपडपट्टी पुर्नवसन रखडले आहे. गेल्या 28 वर्षात निर्णय झालेला नाही. 28 वर्षात उबाठा आणि तेव्हाची शिवसेना यांनी मत घेतली पण मराठी माणसाला घरे देऊ शकले नाहीत. आता उबाठाला तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही.
ही मराठी मुलं आज उपोषणाला बसली आहेत, स्वतःच्या घरासाठी हे तरुण बिनापाण्याचे उपोषणाला बसली आहेत.
प्रकल्प का रखडला? आता कोण विकासक घर बांधणार आहे? कधी घरे मिळणार? या प्रश्नांची उत्तरे रहिवासी मागत आहेत. विकासक नागरिकांना भेटायला येत नाही तो लोकांना चाव्या द्यायला येईल का? आज आमचा मराठी माणूस नाडला जातोय, 28 वर्ष लोकांना घर मिळत नाही, याला जबाबदार कोण? असा सवाल ही आमदार आशिष शेलार यांनी केला.
नाहीतर जीभ हासडावी लागेल !
एक्स (पूर्वीचे ट्विटर) एलॉन मस्क यांना विनंती करणार आहोत की, राजकीय पक्षातील नेते, विशेषतः प्रभादेवीच्या गल्लीत बसून स्वतःला संपादक म्हणवून घेणारे ट्विट करणार असतील त्यांच्या ट्विटला “नो अल्कोहोल कन्झ्युम”, “नो गांजा कन्झ्युम”, असे प्रमाणपत्र जोडावे आणि मगच त्यांनी ट्विट करावे.
दिवसाढवळ्या गांजा आणि चिलीम ओढणारे दुसऱ्यावर आरोप करत आहेत. कोण आहेत संजय राऊत?
त्याच संजय राऊत यांनी गोरेगावमध्ये मराठी माणसांची घरे खाल्ली, बिल्डरसोबत दलाली केली. ज्यांचे हात गांजा, चिलीम ओढण्यात व्यस्त आहेत, त्यांनी इतरांनी आरोप का करावेत?
त्यांच्याकडे २७ फोटो असतील तर आमच्याकडे २७० फोटो आहेत. पेग, पेंग्विन, पार्टीचे जनक आणि चालक कोण? याची सर्व माहिती काढावी लागेल. मुळात राऊत अशी वासूगिरी का करत आहेत? जे गुत्त्याच्या बाहेर चिरीमिरी मिळते की नाही? याची वाट पाहत उभे राहतात, तेच लोक मकाऊ पर्यंत असे फोटो काढण्यासाठी जाऊ शकतात.
देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याआधी स्वतःची लायकी, औकात पाहावी. राऊत यांची लायकी, मराठी माणसांचे घर खाणारी अशी आहे. त्यांनी पंतप्रधानांविषयी बोलताना सांभाळून बोलावं. नाहीतर जीभ हासडावी लागेल, अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला.