श्रीश उपाध्याय/मुंबई
गोवंडी परिसरात विना परवाना औषधोपचार करणाऱ्या बनावट डॉक्टरला मुंबई गुन्हे शाखा 6 ने अटक केली आहे.
गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात बनावट डॉक्टर अवैध प्रॅक्टिस करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 6 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महापालिकेच्या एम वॉर्डचे आरोग्य अधिकारी यांच्यासह छापा टाकला. छाप्यादरम्यान मोहम्मद निजाम खान हा अवैधरित्या औषधोपचार करताना आढळून आला आणि त्याला अटक करण्यात आली. खान यांच्या दुकानातून औषधे आणि संसर्गही जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या सूचनेनुसार
गुन्हे शाखा 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.