क्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

दोन किलो कोकेनसह दोन परदेशी नागरिकांना अटक

श्रीश उपाध्याय

मुंबई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन परदेशी नागरिकांना अटक करून दोन किलो कोकेन जप्त केले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाला एक झांबियाचा नागरिक मुंबईत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
तो कोकेन विकण्याच्या उद्देशाने आला होता. या माहितीच्या आधारे एनसीबीने एका हॉटेलवर छापा टाकून एलए गिलमोर याला दोन किलो कोकेनसह अटक केली. गिलमोरची चौकशी केल्यानंतर दिल्लीत राहणाऱ्या टांझानियन महिलेने त्याच्याकडून ड्रग्ज मागवल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे एनसीबीने दिल्लीशी संपर्क साधला आणि
एम आर अगोस्टिनो याला अटक करून मुंबईत आणण्यात आले आहे. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button