मुंबई गुन्हे शाखे 5 ची कारवाई
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मुंबई
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ५ ने परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने आतापर्यंत 200 ते 300 तरुणांची तब्बल एक कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा अंदाज आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे भरत कोळी नावाच्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष पाच ने या गुन्ह्याचा तपास हाती घेऊन पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिल्ली, भिवंडी आणि बिहार येथून या आरोपीना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजटिलक रौशन यांनी दिली आहे. अटक आरोपींची नावे रामकृपाल रामसेवक कुशावह वय 45, रोहित महेश्वरप्रसाद सिन्हा वय 33, आशिष कुमार मुंगेश्वर मोहता वय 30, आमितोष श्रवणकुमार गुप्ता वय 40 आणि राहुलकुमार शिवान चौधरी वय 22 अशी आहेत.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त लखमी गौतम, अपर पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 5 चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे