नेतृत्व विकास अभियानाच्या माध्यमातून जनतेसमोर वास्तविकता मांडा – नाना पटोले
टिळक भवनमध्ये नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर
देशात गरिबी ही जात आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिब व श्रीमंत या जाती असल्याचे वक्तव्य केले आहे. भाजापाचे हे सरकार जीएसटीच्या माध्यमातून जनतेला लुटत आहे व मुठभर लोकांनाच श्रीमंत बनवत आहे तरी दुसरीकडे गरिब अधिक गरिब बनत चालला आहे. पंतप्रधान गरिबी ही जात म्हणत असले तरी गरिबी ही नाही तर देशाला लागलेला कलंक आहे तो पुसण्याची व गरिबांना सामाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे परंतु भाजपाची मनुवादी प्रवृत्ती गरिब, मागास समाजाचा विकास होऊ देत नाही हा डाव ओळखा. जनतेला खरी परिस्थिती समजली पाहिजे त्यासाठी नेतृत्व विकास अभियानाच्या माध्यमातून जनतेसोमर वास्तविकता मांडा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा (LDM) पार पडली. या कार्यशाळेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक के. राजू, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, आदिवासी विभागाचे प्रमुख डॉ. नामदेव उसेंडी, ओबीसीचे विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, एसी. सी. विभागाचे प्रमुख हत्ती अंबिरे, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, LDM राष्ट्रीय समन्वयक क्षितीज अढ्याळ, LDM प्रदेश समन्वयक व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, OBC राज्य समन्वय धनराज राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पक्ष विजयी घौडदौड करत आहे. हिमाचल प्रदेश व कर्नाटक विधानसभेतील विजयानंतर आता होत असलेल्या पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसचा विजय होईल त्यानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसचा विजय निश्चित होईल. महाराष्ट्रातून जास्तीत जात खासदार निवडून देऊन राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा आमचा संकल्प आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
राज्यातील ९ राखीव लोकसभा मतदारसंघ तसेच विधानसभेतील ५४ राखीव मतदारसंघात काम करण्यासंदर्भात यावेळी के. राजू व राजेश लिलोठीया यांनी मार्गदर्शन केले. पक्ष संघटनेला ताकद देण्यासाठी महत्वाच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी ते व्यवस्थीत पार पाडावे, काँग्रेसाचा विचार तळागाळात पोहचवणे व काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.