मुंबई
पॉक्सो खटल्याच्या सुनावणीनंतर, मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी आरोपीला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
अशी माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी दिली.
रवी महादेव शर्मा यांच्या विरोधात धारावी पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ५९/२०१६ अंतर्गत पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर सानप, पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार यांनी केला. सरकारी वकील कल्पना हीरा यांनी हे प्रकरण न्यायालयासमोर चांगले मांडले.
या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर गुरुवारी विशेष सत्र न्यायाधीश स्मिता जाधव यांनी आरोपी रवी शर्माला 10 वर्षे कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा दिली जाईल.