माझ्या पहिल्या निवडणुकीतील तात्यासाहेबांचे योगदान आयुष्यात कधीच विसरणारण्याजोगे नाही
शरद पवार साहेब यांच्या हस्ते अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
पुणे –
माझ्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीतलं तात्यासाहेबांचे (अनंत पवार) योगदान आयुष्यात कधीच विसरणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी आज पुण्यातील दौैंडमध्ये अनंत पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे.
आज दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सुमित्राताई पवार, प्रतिभाताई पवार, हर्षवर्धन पाटील, अशोक पवार, खासदार सुप्रियाताई सुळे तसेच पवार कुटुंबातील सर्व मंडळी उपस्थित होते. तसेच सोबत या संस्थेचं विश्वस्त मंडळही उपस्थित होते.
आदरणीय शरद पवार साहेब पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात माझी नूकतीच सुरुवात झाली होती. मी विधानसभेला उभे राहण्याच्या प्रतिक्षेत होतो. तेव्हा वय माझं २६ होतं, त्याचवेळी आमदारकी लढवयाचं ठरवलं. त्यावेळी निवडणुकीत माझ्याविरोधात मोठे लोकं होते. त्या काळात निवडणुकीचं अर्थकारण तात्यासाहेबांनी चांगल्या पद्धतीने सांभाळून मला मोठ्या मताधिक्क्याने राज्याच्या विधानसभेवर पाठवल्याचं शरद पवार साहेब यांनी सांगितले आहे.
शरद पवार साहेब यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, तसेच पहिल्या निवडणुकीत मला अनेकांचं सहकार्य लाभलं पण तात्यासाहेब आणि आप्पासाहेबांनी निवडणुकीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. निवडणुकीत त्यांनी लोकांच्या घरोघरापर्यंत पोहोचून प्रामाणिकपणे काम केले होते. त्यावेळी निवडणुकीसाठी एवढा खर्च येत नव्हता. निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी तात्यासाहेबांनी घेतली, निवडणुकीचं अर्थकारण त्यांनी गाजावाजा न करता सांभाळलं होतं. तात्यासाहेबांचे निवडणुकीतले योगदान मी माझ्या आयुष्यात कधीच विसरु शकत नसल्याचंही शरद पवार साहेब म्हणाले आहेत.
तात्यासाहेब यांचा स्वभाव माणसं जोडण्याचा होता, त्यांनी सहकारी चळवळीतही काम केले आहे, त्यामुळे त्यांचा चांगलाच जनसंपर्क होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम अग्रेसर राहायचे, त्यांनी स्वतःचा कधीच विचार केला नाही. ज्यावेळी तात्यासाहेब यांचा मृत्यू झाला त्यावेळी सुप्रियाताई सुळेंच्या मुलाचा जन्म झाला होता. दोघांच्या जन्माची आणि मृत्यूची वेळ एकच होती. त्यामुळे सुप्रियाताई सुळेंचा मुलगा विजयला पाहताच तात्यासाहेब आमच्या आजूबाजूला असल्याची जाणीव होत असल्यांचही शरद पवार साहेब यांनी सांगितले आहे.