बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा
मुंबई : १७ ऑक्टोबर.
राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब व प्रांताध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार १८ ऑक्टोबर व गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी लोकसभा निहाय मतदार संघाचा आढावा प्रदेश पक्ष कार्यालय मुंबई येथे घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
दिनांक 18 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ.
दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दिंडोरी,अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी व जालना लोकसभा मतदारसंघ.
सदरच्या लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकीला त्या त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष फ्रंटलचे पदाधिकारी यांना बैठकीचे निमंत्रण करण्यात आल्याची माहिती तपासे यांनी दिली.