क्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

नवरात्रोत्सवासाठी बनावट पास बनवणाऱ्या चार आरोपींना अटक

श्रीश उपाध्याय

मुंबई

नवरात्रोत्सवासाठी बनावट पास बनवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या चार आरोपींना बोरिवलीच्या MHB पोलिसांनी अटक केली आहे.
नवरात्रोत्सवासाठी काही लोक बनावट पास बनवून विकणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करत करण शहा, दर्शन गोहिल, परेश नेवरेकर आणि कविश पाटील या चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 3000 रुपये किमतीचे 1000 बनावट पास जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलीस फरार आरोपी संतोष आणि स्वप्नीलचा शोध घेत आहेत.


पोलीस उपायुक्त (झोन-11) अजय बन्सल यांच्या सूचनेनुसार वरील कार्रवाई एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक डॉ.दीपक हिंदे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर , मुकेश खरात , पोलीस हवालदार प्रदीप घोडके , अनंत शिरसाट , रुपाली दैंगडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button