मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहलची भेट
मुंबई
मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहलची भेट घेतली .
शिष्टमंडळाने बृहन्मुंबई पालिका आयुक्त यांना बृहन्मुंबईतील मोकळ्या जागेवर (open space) मोकळया जागा खाजगी संस्थांना हस्तांतरित करण्याचा विरोध केला आणि मोकळ्या जागे करिता कायदा लागू करण्याची मागणी केली तसेच संपूर्ण बृहन्मुंबईतील 24 मनपा वार्डात होत असलेल्या व्यापक भ्रष्टाचाराबद्दल तसेच लोकांना मिळत नसलेल्या नागरी सुविधा अशा अनेक विषयावर तब्बल 2 तास चर्चा केली.
या शिष्टमंडळात मुंबई काँग्रेस अध्यक्षा श्रीमती वर्षाताई गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार अमीन पटेल, माजी विरोधी पक्ष नेता रवी राजा, काँग्रेसचे आमदार व सर्व माजी नगरसेवक आणि प्रमुख नेते उपस्थित होते.