मुंबई:
दिनांक ९ ऑक्टोबर २०२३
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील रामलीला मंडळे आपल्या समस्या घेऊन कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे आले होते. प्रभू राम चंद्राची जीवनगाथा रामलीलेच्या माध्यमातून लोकांसमोर आणून समाजात एक आदर्श लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न ही मंडळे अनेक वर्षे करत आहेत. त्या संदर्भात श्री. मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाबरोबर समन्वय बैठक पालकमंत्री दालनात दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केली होती. बैठकीत प्रशासनाला त्यांनी काही निर्देश दिले होते. त्या निर्देशांची पूर्तता आज करण्यात आली आहे.
प्रशासनाने खालील बाबींचे निर्देश काढले.
१) रामलीला कार्यक्रमासाठी एक खिडकी योजना सुरू करणार
२) मैदानाचे शुल्क अर्ध केले जाणार आहे
३) फायर ब्रिगेडचे शुल्क पूर्णपणे माफ केले जाईल
४) रामलीला कार्यक्रमाच्या परिसरातील स्वच्छतेच्या दृष्टीने मोबाईल टॉयलेट तसेच फवारणी केली जाईल.
महाराष्ट्रातील विद्यमान सरकार हे जनतेचे सरकार आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे असेही पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले.