साकीनाका पोलिसांची कार्रवाई
300 कोटींच्या अमली पदार्थांसह 12 जणांना अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
तब्बल दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर 12 आरोपींना 300 कोटींच्या अमली पदार्थांसह अटक करण्यात मुंबईतील साकीनाका पोलिसांना यश आले आहे.
८ ऑगस्ट रोजी साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही लोक एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची गुप्त माहिती साकीनाका पोलिसांचे अशोक जाधव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अन्वर सय्यद याला १० ग्रॅम एमडीसह अटक केली. या अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पोलिसांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे की, दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरी गाठली जिथून ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. नाशिकमधील या कारखान्यातून 133 किलो ड्रग्ज सापडले असून, कारखान्याचा चालक जीशान शेख यालाही अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना अन्वर सय्यद, जावेद खान, आसिफ शेख, इक्बाल मोहम्मद अली, सुंदर शक्तीवेल, हसन शेख, आरिफ शेख, अयुब सय्यद, नासिर शेख, अझहर अन्सारी, रेहान आलम अन्सारी आणि जीशान शेख यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कार्रवाई दरम्यान एकूण 151 किलो एमडी जप्त करण्यात आले ज्याची किंमत 300 कोटी रुपये आहे.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परम जीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त भरतकुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक गबाजी चिमटेचा
पथकाने वरील कारवाई केली आहे.