क्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending
मुंबई गुन्हे शाखा 7 ची कारवाई
60 किलो गांजासह चौघांना अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबई गुन्हे शाखा 7 ने मुलुंड परिसरात एका कारमधून 60 किलो गांजा जप्त केला असून चार आरोपींना अटक केली आहे.
मुलुंडमधील वैशाली नगर परिसरात ३ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा ७ चे पोलीस गस्त घालत होते. गस्तीदरम्यान त्यांना एक कार संशयास्पद अवस्थेत दिसली. पोलिसांनी कार थांबवून तिची झडती घेतली असता कारमधून दोन गोण्यांमध्ये भरलेला 60 किलो गांजा जप्त करण्यात आला. कारमध्ये बसलेल्या मोशीम गफूर शेख, मोहम्मद रहीम खान, रोहित भालेराव आणि राकेश गायकवाड या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुलुंड पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलुंड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वरील कारवाई गुन्हे शाखा 7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने केली आहे.